नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी आहे. मलिक यांनी मुस्लिम आरक्षणाबाबतची भूमिका योग्य नाही. वस्तुस्थितीला धरून नाही. मलिक यांची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणासोबतच मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याचा जीआर काढण्यात आला होता. मात्र हे प्रकरण कोर्टात गेलं आहे. मात्र, मलिक हे ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर बोलत आहेत. ते वस्तुस्थितीला धरून नाही. मलिक यांची भूमिका संघासारखी आहे. मुस्लिमांना आरक्षण मिळू नये, अशी संघाची भूमिका आहे. आता मलिकही याच बोटीतून प्रवास करताना दिसत आहे, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.
नवाब मलिक मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत. राष्ट्वादी आणि भाजपचे संबंध जगजाहीर आहेत. नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत त्यामुळे ही भूमिका राष्ट्रवादीची आहे, असंही ते म्हणाले.
मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण लागू करावं. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे आता प्रत्येक समाजाने मेळावे घेतले पाहिजे. त्याबाबतची जागृती केली पाहिजे. इम्पिरिकल डेटा का गोळा केला नाही याचा जाब विचारला पाहिजे. सरकारची पोलखोल केली पाहिजे. गोवारी समाजासारखी अवस्था होऊ नये असे ओबीसींना वाटत असेल तर त्यांनी समाजात जागृती केली पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे तोऱ्यात वावरत आहेत”, राऊतांचा राेखठोकमधून मोदींवर प्रहार
- “लोकसभेच्या गॅलरीतून डोकावणारे पत्रकार ही लोकशाहीची खरी…”, लोकसभेत पत्रकार बंदीवर राऊतांची टीका
- ‘खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले’, शिवसेना आ.चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र
- पंतप्रधान मोदींची घोषणा; ‘या’ तारखेपासून सुरु होणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
- ‘ज्यांच्या पक्षाची अर्थव्यस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यस्था कशी मजबूत करतील?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
