🕒 1 min read
नवी-दिल्ली : काल(२६ डिसें.)रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी लसीकरणासंदर्भात तीन महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण, आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बूस्टर डोस दिल्या जाणार आहे.
यावेळी बोलत असतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘पुढील महिन्यापासून या लसीकरणास सुरुवात होणार आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास ३ जानेवारी २०२२ पासून सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस १० जानेवारीपासून सुरु होणार असून ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना सुद्धा बूस्टर डोसचा पर्याय उपलब्ध करण्यात आला असून डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना बूस्टर डोस दिल्या जाईल’, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट अर्थातच ओमायक्रॉनचे संकट आले आहे. तसेच ओमायक्रॉनचा भारत देखील याचा संसर्ग वाढत असल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु घाबरून न जाता सतर्क राहत नियमांचे पालन करण्याची गरज आहे. यासाठी नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे.’ तसेच भारताने आत्तापर्यंत १४ कोटी डोस दिले असून देशात लवकरच नाकाद्वारे देणारी लस आणि डीएनए लस देण्यात येणार आहे, असेही मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे तोऱ्यात वावरत आहेत”, राऊतांचा राेखठोकमधून मोदींवर प्रहार
- “लोकसभेच्या गॅलरीतून डोकावणारे पत्रकार ही लोकशाहीची खरी…”, लोकसभेत पत्रकार बंदीवर राऊतांची टीका
- शाळेबाबत अद्याप निर्णय नाही; राजेश टोपेंची माहिती
- …म्हणून मेनका गांधींनी माझी भेट घेतली; आव्हाडांनी केला त्या भेटीचा खुलासा
- केंद्र सरकार पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या तयारीत?; केंद्रीय कृषीमंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
