Share

हरभजनच्या निवृत्तीनंतर सौरव गांगुलीने दिला जुन्या आठवणींना उजाळा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी हरभजन सिंगच्या (Harbhajan Singh) निवृत्तीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सौरव गांगुलीने हरभजन सिंगला त्याच्या शानदार कारकिर्दीसाठी अभिनंदन केले आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक 2001 मालिकेतील त्याच्या घातक गोलंदाजीची आठवण करून दिली आहे.

भारतीय संघाकडून दीर्घकाळ खेळल्यानंतर हरभजन सिंगने अखेर क्रिकेटला अलविदा केला आहे. हरभजन सिंगने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. “23 वर्षांचा प्रवास संपला, आता खेळाला अलविदा, असे हरभजनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले. आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर करत हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची हॅट्ट्रिक संस्मरणीय असल्याचे म्हटले.

हरभजन सिंग मॅच विनर : सौरव गांगुली

बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात सौरव गांगुली म्हणाला, “2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची त्याची पहिली पूर्ण कसोटी मालिका खूपच नेत्रदीपक होती. मी पहिल्यांदाच एका गोलंदाजाने संपूर्ण मालिका एकहाती जिंकताना पाहिले. तो जबरदस्त गोलंदाज होता. तो एक जबरदस्त सामना विजेता होता आणि त्याने जे काही साध्य केले त्याचा त्याला अभिमान वाटला पाहिजे.”

2001 च्या कसोटी मालिकेत हरभजन सिंगने तीन सामन्यात एकूण 32 विकेट्स घेतल्या होत्या आणि या काळात हॅट्ट्रिकही घेतली होती. भज्जीने भारतीय संघासाठी 103 सामन्यात 417 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 236 सामन्यात 269 विकेट घेतल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरभजन सिंगने 28 सामन्यांमध्ये 25 विकेट घेतल्या आहेत. भज्जीने कसोटी क्रिकेटमध्ये 2 शतकी खेळी देखील केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!