Share

एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आणू नये-अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून (२२ डिसें.) सुरु होत आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते यंदा मात्र ते मुंबईत होणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप (ST bus strike) मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आणू नये, असा इशरा त्यांनी एसटी कर्मचऱ्यांना दिला आहे.

अजित पवार यावेळी म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करुन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ आणि पगारातही वाढ देण्यात आली आहे. एसटी संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सेवेत रुजू व्हावे. टोकाचा निर्णय घेण्याची वेळ कर्मचाऱ्यांनी आणू नये. शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अजित पवार यांनी यांनी केले आहे.

राज्यपालांचे कुलगुरु निवडीचे अधिकार कमी केल्याबाबत विरोधकांनी आरोप केला आहे, या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, विद्यापीठांचे कुलगुरू नेमण्यात राज्यपालांचे अधिकार कमी करण्याचा प्रश्नच नाही. याबाबत समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीकडून राज्य शासनाला पाच नावे सुचविण्यात येणार असून त्यापैकी दोन नावे निश्चित करून राज्यपालांकडे पाठविली जाणार आहेत. त्यातून राज्यपालांकडूनच कुलगुरुंची नियुक्ती होणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

परीक्षा घोट्याळ्याबाबात प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षासंदर्भात तक्रारी आल्या आहेत. याची सखोल चौकशी करण्यात येत असून याबाबतचा तपास सुरु आहे. कोणत्याही गैरप्रकाराला पाठीशी घातले जाणार नाही. या सर्व प्रकरणाबाबत पोलीस तपास करत असून पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!