🕒 1 min read
मुंबई : राज्यातील १०५ नगर पंचायत (Nagar Panchayat Election) निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे. ३२ जिल्ह्यातील १०५ नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे. एकूण, ७ लाख ६८ हजार ८६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून १३२२ मतदान केंद्रावर मतदान होत आहे.
या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविना (OBC Political Reservation) ही निवडणूक पार पडत आहे.
राज्यातील या नगर पंचायतीसाठी मतदान
सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी
सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ
ठाणे- मुरबाड व शहापूर,
पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा,
रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली,
रत्नागिरी- मंडणगड, दापोली,
सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ,
पुणे- देहू
सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग, नातेपुते
नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा,
धुळे- साक्री,
नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ,
अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी,
जळगाव- बोदवड
औरंगाबाद- सोयगाव
जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी
परभणी- पालम,
बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी,
लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ,
उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु.,
नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर,
हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ,
अमरावती- भातकुली, तिवसा,
बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा,
यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी,
वाशिम- मानोरा,
नागपूर- हिंगणा, कुही,
वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर,
चंद्रपूर- पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा,
गडचिरोली- एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड
भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर,
गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली.
महत्वाच्या बातम्या
- …पण कोरोनाची दहशत संपणार कधी?
- छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते; महादेव जानकर यांचे वादग्रस्त वक्तव्य
- ६८ वर्षीय महिलेची गजब याचिका; ‘लाल किल्ला माझ्या नावावर करा’
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ४९ विषयांसाठी २३१ प्राध्यापकांची निवड; रुजू होण्याचे आदेश
- ‘निवडणूक कायदा दुरुस्ती’ विधेयक लोकसभेत मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
