🕒 1 min read
कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडीने राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठी जी कारणे लागतात,त्यातील एकही कारण शिल्लक ठेवलेले नाही, अशी जहरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोल्हापूर येथे केली आहे.
राज्यपालांनी निरोप पाठवला असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचाच अर्थ तुम्ही राज्यपालांचा अपमान करत आहात. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी जी कारणे लागतात, त्यातील एकही कारण महाविकास आघाडी सरकारने शिल्लक ठेवलेले नाहीये. त्यामुळे राष्ट्रपती आता वाट बघत आहेत. अशी टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकारचा सर्व सावळागोंधळ सुरू आहे. कोण आजारी आहे. कोण तुरुंगात आहे. राज्यात सगळय़ात गोंधळ सुरू आहे. जनतेसमोर गेलात की कळेल की लोक कोणासोबत आहेत ते. फक्त संजय राऊतच सतत प्रवक्ते असल्यासारखे वक्तव्य करतात. मात्र इतरांना बाजूला केले आहे. यातूनच सेनेतील सर्व गोष्टी बाहेर पडत असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …पण कोरोनाची दहशत संपणार कधी?
- छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते; महादेव जानकर यांचे वादग्रस्त वक्तव्य
- ६८ वर्षीय महिलेची गजब याचिका; ‘लाल किल्ला माझ्या नावावर करा’
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ४९ विषयांसाठी २३१ प्राध्यापकांची निवड; रुजू होण्याचे आदेश
- ‘निवडणूक कायदा दुरुस्ती’ विधेयक लोकसभेत मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
