🕒 1 min read
जळगाव : एकनाथ खडसेंना १५ वर्ष लाल दिवा आणि १२ खाती मिळाली पण त्यांना विकासकामे करण्यात अपयश आले. आता त्यांनी दुकानदारी बंद करावी. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो, अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास आणि म्हणे मोठा नेता, अशी टीका भाजपा नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत केली.
गिरीश महाजन पुढे म्हणाले, चुकीच्या वागणुकीमुळे लोकांनी तुम्हाला शिक्षा दिली आहे. कमिशनसाठी लल्लू-पंजू भांडतात आणि कसा विकास होईल. आता कितीही आवाज चढवला तरी तुमची धार बोथट झाली आहे. आता तुमचं खरं नाही दुकानदारी बंद करा, असा टोला महाजनांनी खडसेंना लगावला.
शेरोशायरी करता, स्वत:ला तुम्ही सव्वाशेर म्हणवून घेता, ते तुम्हाला लिहून देतात अन् तुम्ही वाचता. आता तुम्ही शेरोशायरी करावी. तुमचा आता दबदबा राहिलेला नाही. तुम्ही सव्वाशेर नाही आता पावशेर झाले आहात, असा टोलाही महाजनांनी खडसेंना लगावला.
एकनाथ खडसे मतदारांना सांगतात, गिरीशभाऊंना मी मोठं केलं. मला कुणी मोठं केलं नाही विकासकामांमुळे मी मोठा झालो. लोकांची कामे करावी लागतात. लोकांची सेवा केली म्हणून आतापर्यंत लोकांनी निवडून दिलं. कमीत कमी २५ हजारच्या लीडने निवडून आलो आहे. मी आतापर्यंत कधी पंचवीस हजारांच्या खाली आलो नाही. तुम्ही तर कधी अठराशे मताने, कधी आठ हजार मतांनी असे निवडून आले आहेत, असं देखील गिरीश महाजन म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ”दोन महिन्यांपासून पठ्ठ्या कुठंय?”; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका
- ‘भाजपावाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठा, बोम्मईंचे सरकार आता घालवाच!’
- शिवरायांचा अपमान ही किरकोळ किंवा छोटी घटना असेल तर मोठे काय? शिवसेनेचा सवाल
- ”जयंतराव, हा शहाणपणा राजू नवघरे आणि नवाब मलिकांना सांगा”
- …पण ह्या राष्ट्रवादी आमदार राजू नवघरेचं काय करायचं? नितेश राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
