🕒 1 min read
मुंबई : राज्यात सध्या नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. एका प्रचार सभेमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी त्यांच्या मतदार संघातील रस्त्यांची तुलना बॉलिवूडची अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केली आहे. ‘माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले आहेत. तुम्ही काय महाराष्ट्राला शिकवता?’, असे पाटील म्हणाले होते. दरम्यान, पाटलांच्या या टिकेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत, गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही. मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तात्काळ गुन्हा दाखल करा.. नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही’, असे त्या म्हणाल्या.
शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत.. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत.. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही…
मी @maharashtra_hmo ना आवाहन करतीये..तात्काळ गुन्हा दाखल करा..नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.. pic.twitter.com/5wp3sI0hCN
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 19, 2021
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’शिवसनेनेच्या नेत्यांना झालंय काय? राऊतानंतर आत्ता गुलाबराव पाटील त्यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केलं.गुलाबराव पाटील-रांझ्याचा पाटील वृत्ती तीच आहे. महाराजांनी त्याची पाटीलकी काढून घेतली, गुलाबरावाची मंत्रीपदावरून हकालपट्टी कधी होणार?’,असा सवालही चित्रा वाघ यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची देशावर वेळ- संजय राऊत
- “केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही”
- “छत्रपतींसमोर नतमस्तक न होणाऱ्या मलिकला कडेवर घेणारे आम्हाला शहाणपण शिकवताय”
- राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राष्ट्रवादीकडून आज दुग्धाभिषेक
- “मोदींजींनी खरे शिवभक्त असल्याचे संपूर्ण देशाला दाखवून द्यावे, अन्यथा…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
