🕒 1 min read
मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून समाजकंटकांनी गुरुवारी(१६ डिसें.) रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई(Basavraj Bommai) यांनी या घटनेवर केलेल्या असंवेदनशील वक्तव्याचाही तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज(१९ डिसें.)शिवसेनेने दादरच्या शिवाजी पार्कात जोरदार आंदोलन केले.
यावेळी माध्यमांशी संवाद साधत असतांना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की,’हिंदुस्थान चांगला बनवला तर तुमचे आभार मानू. पण पुतळ्याची विटंबना करणारी अवलाद तुमच्यात असेल तर त्याच्या गळ्याचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. इतिहास बदलण्याचा प्रयत्न कराल तर भूगोल केल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटक महाराष्ट्राची बॉर्डर आहे. तिथे शिवसैनिक तुमचा इतिहास बिघडवल्याशिवाय राहणार नाही. आमच्या वाघिणी फाडून टाकतीलच. पण या प्रकरणी संसदीय कारवाई व्हायला हवी.’
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’मावळ्यांना त्रास द्याल तर पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकातील लोकांप्रमाणेच केंद्र सरकार वागत आहे. कर्नाटक भारतातच आहे ना? मग पाकिस्तानात किंवा चीनमध्ये असल्यासारखे का वागत आहेत? असा सवाल त्यांनी केला. तसेच महाराष्ट्र पेटला आहे, वेळीच आवरा, असा इशाराही यावेळी पेडणेकर यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची देशावर वेळ- संजय राऊत
- “केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही”
- “छत्रपतींसमोर नतमस्तक न होणाऱ्या मलिकला कडेवर घेणारे आम्हाला शहाणपण शिकवताय”
- राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राष्ट्रवादीकडून आज दुग्धाभिषेक
- “मोदींजींनी खरे शिवभक्त असल्याचे संपूर्ण देशाला दाखवून द्यावे, अन्यथा…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
