🕒 1 min read
मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून समाजकंटकांनी गुरुवारी(१६ डिसें.) रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच छत्रपतींच्या पुतळ्यावर शाई फेकणारा काँग्रेस आमदार बी. जमिरचा कार्यकर्ता असून कर्नाटक सरकारने त्याला अटक केली आहे. टिपुसेना काँग्रेसला जाब विचारायचा सोडून भाजपा कार्यालयावर मोर्चा काढतेय. छत्रपतींसमोर नतमस्तक न होण्याची मुजोरी करणाऱ्या नवाब मलिकला कडेवर घेणारे आम्हाला शहाणपण शिकवतायत, असेही भातखळकर म्हणाले आहेत.
यासंदर्भात भातखळकरांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणारा त्याठिकाणच्या स्थानिक काँग्रेसच्या मुस्लिम आमदाराच्या कार्यकर्त्याला कर्नाटक सरकारने अटक केली. परंतु,या प्रश्नावरून राजकारण करणाऱ्या आणि पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांना माझे दोन खडे सवाल आहेत. ज्या नवाब मलिकला तुम्ही ‘गुड गोइंग’ बोललात त्याच नवाब मलिकने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करायला नकार दिला होता. त्यावेळी तुम्हाला हे आठवलं नाही? काही महिन्यांपूर्वीच ज्यांच्याबरोबर तुम्ही सत्तेत आहात त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने छत्रपती शिवाजी महाराजांची बूट घालून त्याठिकाणी जाऊन विटंबना केली होती. त्यावेळी आपण मुकगिळून बसलात. आणि आता कर्नाटकातला काँग्रेसच्या आमदाराचा खास मनुष्यही विटंबना करतोय तर आपण सोनिया गांधींनाही पत्र लिहिणार का?’ असा सवालही भातखळकरांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केला आहे.
छत्रपतींच्या पुतळ्यावर शाई फेकणारा काँग्रेस आमदार बी. जमिरचा कार्यकर्ता. कर्नाटक सरकारने त्याला अटक केली आहे. टिपुसेना काँग्रेसला जाब विचारायचा सोडून भाजपा कार्यालयावर मोर्चा काढतेय. छत्रपतींसमोर नतमस्तक न होण्याची मुजोरी करणाऱ्या नवाब मलीकला कडेवर घेणारे आम्हाला शहाणपण शिकवतायत. pic.twitter.com/ngWbpZJKpN
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 18, 2021
दरम्यान, या घटनेमुळे बेळगाव आणि नजीकच्या परिसरातील शिवप्रेमी आक्रमक झाले असून नागरिकांनी धर्मवीर संभाजी चौकात जमून सर्व रस्ते बंद केले आहेत. यामुळे बेळगावात कलम १४४ ‘अ’ नुसार जमावबंदीचा आदेश पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची देशावर वेळ- संजय राऊत
- “केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही”
- कदम कोणत्याही पक्षात गेले तरीही त्यांची किंमत शून्यच; निलेश राणेंची जहरी टीका
- ‘शिवसेनेत गद्दार दुसरं तिसरं कोणी नसून फक्त रामदास कदमच महागद्दार’
- रामदास कदमांच्या टीकेवर अनिल परबांची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
