Share

यह इंसान अलग मिट्टी से बना है; भातखळकरांनी उधळली मोदींवर स्तुतिसुमने

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) दोन दिवसीय वाराणसी (Varanasi) दौऱ्यावर आहेत. दरम्यान मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्री ट्विट केलं, ज्यात त्यांनी लिहिलं, काशीमधील विकासकामांची पाहणी करत आहे. या पवित्र नगरीसाठी सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मध्यरात्री काशीची विकासकामे पाहण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. मोदींनी मध्यरात्री बनारस स्टेशनला भेट दिल्याचे कौतुक भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar)यांनी केले आहे.

दिवसभराचा काशी विश्वनाथ कॉरिडॉर लोकार्पण सोहळा पार पाडून पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रात्री १.१३ ला नूतनीकरण करण्यात आलेल्या बनारस रेल्वे स्थानकावर भेट देण्यासाठी पोहचले. यह इंसान अलग मिट्टी से बना है। असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी मोदींवर कौतुकाची स्तुतिसुमने उधळली आहेत.

दरम्यान काशी विश्वनाथ कॉरीडॉरचे उद्घाटन करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात पूजा केली. गंगास्थान केले तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण देखील केले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता कर्मचारी आणि कामगारांवर पुष्प वर्षाव करून त्यांचा सन्मान देखील केला. दरम्यान काशी विश्वनाथ कॉरीडॉर या प्रकल्पाच्या फेज 1 या प्रकल्पाची किंमत साधारण 339 कोटी इतकी आहे. हा प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगेचा वाराणसीमधला किनारी प्रदेश यांना जोडणारा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!