🕒 1 min read
मुंबई : नागपूरमधील केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता यावरूनच काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant)यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून राज्यातील महत्त्वाच्या संस्था या जाणीवपूर्वक दुसऱ्या राज्यात हलवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याअगोदर बीकेसीमधील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता त्यानंतर नागपूरमधील केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला हलवले. मात्र असे असूनही राज्यातील भाजप नेते गप्प का, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प, संस्था या इतर राज्यात हलवण्यात आल्या. केंद्रातल्या भाजप सरकारकडून मुंबईचे आर्थिक महत्त्व कमी करण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरी देखील राज्यातील भाजपा मुग गिळून गप्प असल्याची टीका सचिन सावंत यांनी केली आहे. दरम्यान केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. विविध सामाजिक, आर्थिक समस्यांवर जागरुकता निर्माण करून संघटीत आणि अंसघटीत कामगारांच्या सक्षमीकरणासाठी संस्था काम करते. ही राज्यात असलेली एक महत्त्वाची संस्था होती. मात्र आता ती दिल्लीला हलवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तर तुमचा राग….; म्हाडा पेपरफुटी प्रकरणी राज ठाकरे आक्रमक
- सामाजिक एकोप्यातून देशाची प्रगती-चंद्रकांत खैरे
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
