🕒 1 min read
औरंगाबाद : मनसे म्हणजे गळकं घर आणि शिवसेना चिरेबंदी वाडा. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादेत मनसे वर अशाप्रकारे टिका केली. यावर मनसेने ही आता प्रत्युत्तर दिले आहे शिवसेनेने स्वतःचे घर किती गळके आहे ते देखील जरा बघावे. त्या घराचा डोलारा कधी कोसळेल हे लवकरच दिसून येईल. अशा प्रकारची टीका मनसेचे सुमित खांबेकर(Sumit khambekar) यांनी शिवसेनेवर केलेली आहे.
गुरुवारी पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये अनेकांचा पक्षप्रवेश सोहळा झाला. मात्र यावेळी मोठा धक्का हा मनसेला मिळाला. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे औरंगाबादमध्ये येण्यापूर्वीच मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचून घेण्यात शिवसेनेने यश मिळवले आहे. यावेळी जिल्ह्यातील विकास कामांमुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचे पर्व सुरू झाले असल्याचे देखील सुभाष देसाई म्हणाले. क्रांती चौकातील शिवसेना संपर्क कार्यालय या ठिकाणी शिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ९) जिल्ह्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
१४ डिसेंबर रोजी शहरात मनसेच्या पक्षबांधणीसाठी राज ठाकरे येत आहेत. मात्र त्यापूर्वीच शहरात मनसेला गळती लागली आहे. या कार्यक्रमात बोलतांना देसाई म्हणाले, मनसेही गळकं घर असल्याने मनसेचे पदाधिकारी स्वगृही परतत आहेत. कारण शिवसेनेचा वाडा गळका नाही. येथे प्रवेश मिळतो पण बाहेर जाण्यासाठी कुणी दरवाजा उघडत नाही. यावेळी मनसेचे माजी शहराध्यक्ष राजेश थोरात, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सतीश फुलारे, शंकर कदम, अक्षय मस्के, माजी नगरसेवक कांतीलाल नेरपगार यांच्यासह आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.
‘ते’ मनसेचे पदाधिकारी तरी आहेत का?
पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या वक्तव्याचा मनसेने चांगलाच समाचार घेतला आहे मनसेचे सुमित खांबेकर म्हणाले, मनसेच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला हे देसाई यांनी दाखवावे. पदाधिकारी प्रवेश करता ते पदाधिकारी आहेत का? हे तपासलं असतं तर बरं झालं असतं. पत्रकारांना बातमी देतांना तरी योग्य माहिती दिली असती तरी चांगलं झालं असतं. असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आज गोपीनाथ मुंडे असते तर भाजपसोबत युती कायम राहिली असती’
- ‘रोहित शर्मा एक जबरदस्त कर्णधार’
- जयंत पाटलांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या करेक्ट बाराच्या ठोक्याला शुभेच्छा
- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेगा जॉब फेयरचे आयोजन
- ‘शिखर धवन लवकरच पुनरागमन करेल’, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केला विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
