औरंगाबाद : एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या महिनाभरापासून संपावर आहेत. संप मिटवण्यासाठी प्रशासनाद्वारे वेगवेगळ्या क्लुप्त्या केल्या जात आहेत. मात्र एसटी कर्मचारी आपला हेका सोडायला तयार नाहीत. औरंगाबाद विभागातील अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचा फोटो सोशल माध्यमांवर शेअर करत, ‘बुलाता है मगर जाने का नही’ म्हणत त्यांच्या या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.
विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रुजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. असे आश्वासन परिवहनमंत्र्यांनी दिलेले आहे. मात्र त्यानंतरही औरंगाबाद जिल्ह्यातील एसटी कर्मचारी कामावर रुजू झालेले नाही. जोपर्यंत आमची विलिनीकरणाची मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही अशी भूमिका संपास बसलेल्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आमच्यातील कोणीही आत्तापर्यंत रुजू झालेले नाही. आणि होणारही नाही. आम्ही आमच्या मतावर ठाम असल्याची प्रतिक्रिया जयश्री हजारे यांनी दिली.
निलंबन मागे घेऊ मात्र कारवाया मागे घेण्यात येतील असे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिलेले नाही. त्यामुळे येणाऱ्या २० डिसेंबरपर्यंत आमचा जो जाहीर दुखवटा आहे आम्ही तो पाळणार आहोत. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील दिशा ठरवली जाईल अशी माहिती मध्यवर्ती बसस्थानकातील संपकरी मकरंद कुलकर्णी यांनी दिली. मध्यवर्ती बसस्थानकात आज एकही कर्मचारी रोजी झालेला नाही मात्र सिडको बस स्थानकात १ चालक रुजू झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
संप मिटणार नाही
परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी कर्मचाऱ्यांना रुजू होण्याचे आवाहन केले होते. सोमवारपर्यंत कामावर आलात तर आपले निलंबन रोखण्यात येईल. असे त्यांनी सांगितले होते. मात्र त्यांच्या या आवाहनाला कर्मचाऱ्यांनी चांगलाच हरताळ फासला आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही संप मागे घेणार नाही. आमच्या मागण्यांवरून हटणार नाही. अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आज गोपीनाथ मुंडे असते तर भाजपसोबत युती कायम राहिली असती’
- ‘रोहित शर्मा एक जबरदस्त कर्णधार’
- जयंत पाटलांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या करेक्ट बाराच्या ठोक्याला शुभेच्छा
- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेगा जॉब फेयरचे आयोजन
- ‘शिखर धवन लवकरच पुनरागमन करेल’, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केला विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
