🕒 1 min read
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL-2022) च्या पुढील हंगामाची तयारी सुरूझाली आहे. सध्याच्या सर्व 8 संघांना 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. IPL2022 पूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे. विद्यमान आठ फ्रँचायझी जास्तीत जास्त 4 खेळाडूच ठेवू शकतात. एवढेच नाही तर पुढील हंगामात 8 ऐवजी 10 संघ सहभागी होतील. दरम्यान, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) च्या रिटेन्शन लिस्टमध्ये नसल्याचे बोलले जात आहे.
उजव्या हाताच्या फलंदाजाने 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि दिल्लीचे कर्णधारपदही सांभाळले. तथापि, श्रेयस अय्यरचे या संघाशी असलेले संबंध आता संपुष्टात येऊ शकतात कारण दिल्ली संघ सध्याचा कर्णधार ऋषभ पंत, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ आणि अक्षर पटेल यांना कायम ठेवण्याचा विचार करत आहे. मिळालेल्या महितीनुसार, श्रेयस अय्यरवर या लिलावात मोठी बोली लागू शकते.
२६ वर्षीय अय्यरने अलीकडेच कसोटी पदार्पण केले आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात (IND vs NZ ) शतक झळकावले. त्याने 105 धावांची दमदार खेळी केली. त्याने दिल्ली संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र नंतर दुखापतीमुळे त्याला लीगमधून माघार घ्यावी लागली आणि ऋषभ पंतने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. एका वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स संघात श्रेयस अय्यरचा समावेश करण्याचा विचार आहे. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडे आहे. विशेष म्हणजे रोहित आणि श्रेयस अय्यर हे दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतात.
पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबईला लिलावात आपले प्रमुख खेळाडू कायम ठेवणे कठीण जाईल परंतु फलंदाजी क्रम मजबूत करण्यासाठी श्रेयस अय्यरला जोडले जाऊ शकते. ‘मुंबई इंडियन्स देखील श्रेयसला लिलावात घेण्यास इच्छुक असताना, किमान एका विद्यमान फ्रँचायझीला देखील तो हवा आहे कारण तो कर्णधार म्हणून पाहिला जात आहे,’ असे अहवालात म्हटले आहे. अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन संघ खेळताना दिसतील.
महत्वाच्या बातम्या:
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे
- अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?- संजय राऊत
- ‘…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात’, भाजपवर राऊतांची टोलेबाजी
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
