🕒 1 min read
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी सुरु केलेल्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मोदींनी हे कायदे मागे घेण्याची घोषणा केली मात्र संसदेत विधेयक मंजुर करुन हे कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन संपवणार नाही, अशी भूमिका या शेतकरी संघटनांनी घेतली आहे. यावर काँग्रेसच्या सरचिटनीस प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे.
प्रियंका गांधी म्हणाल्या, शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले, शेतकऱ्यांचा सत्याग्रह ७०० शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर हा भाजपा सरकारचा अहंकार आणि अन्नदात्यांवर केलेले अत्याचार म्हणून हे वर्ष ओळखले जाईल.
किसान आंदोलन का एक साल
किसानों के अडिग सत्याग्रह, 700 किसानों की शहादत और निर्मम भाजपा सरकार के अहंकार व अन्नदाताओं पर अत्याचार के लिए जाना जाएगा।
लेकिन भारत में किसान की जय-जयकार हमेशा थी, है और रहेगी।
किसानों के संघर्ष की जीत इसका प्रमाण है।जय किसान। pic.twitter.com/KCWnLNog0B
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 26, 2021
भारतीय शेतकऱ्यांचा जयजयकार नेहमी होत आलेला आहे. आणि तो होत राहील. शेतकऱ्यांच्या संघर्षाला आलेले यश हे याचे प्रमाण आहे, जय किसान. असे ट्विट प्रियंका गांधींनी केले आहे. राकेश टिकैत यांनी ‘जोपर्यंत कायदे रद्दबातल होत नाहीत, तोपर्यंत घरवापसी नाही’ असा नारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेतले असल्याची माहिती १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता दिली. मोदींनी देशाला संबोधित करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली त्यात नुकतीच त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफी देखील मागितली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये भाजप मंडळ अध्यक्षाची निघृण हत्या
- ‘..हा हल्ला मुंबईच्या नव्हे तर देशाच्या काळजावर झाला’, अदिती तटकरेंची प्रतिक्रिया
- ‘मी आज…’; माजी नगरसेवकाचे वक्तव्य ऐकून एकनाथ शिंदे चकित
- …हा हल्ला दहशतवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारा- मुख्यमंत्री ठाकरे
- भारतावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला परतवून लावणाऱ्या मुंबईकरांना सलाम- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
