🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये आता फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील काँग्रेस पक्षाच्या काही मंत्र्यांच्या खात्यात आदलाबदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्ली दौऱ्यावर गेले असल्याने राज्यातील काँग्रेस बदल घडवण्याच्या विचारात असल्याचने सांगण्यात आले आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष कोण असेस याची निवड देखील केली जाणार आहे. तोपर्यंत विधानसभा अध्यक्षपदाच्या नावावरही काँग्रेसकडून शिक्कामोर्तब होणार, असं स्पष्ट दिसत आहे. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून काँग्रेसमध्ये मंत्र्यांच्या खाते बदल होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
एका कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा घेऊन त्याजागी नाना पटोले यांना मंत्रिपद आणि पश्चिम महाराष्ट्रातील एका आमदाराला राज्यमंत्रिद दिले जाणार असल्याची चर्चेने जोर धरला आहे. मंत्र्यांत नाराजीही दिसून आल्याने पक्षश्रेष्ठी बदलापासून लांब राहिले होते. मात्र आता ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
पंजाब आणि आता राजस्थानातील बदलानंतर महाराष्ट्रातही तसे घडू शकते, या चर्चा सुरू आहे. त्यातच नाना पटोले हे मंगळवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाल्याने पक्षात नव्या घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचेही बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- अमरावती हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ३१५ जणांना अटक
- धक्कादायक! गौतम गंभीरला ‘इसिस’कडून जीवे मारण्याची धमकी
- भाजपला मोठा धक्का; नीट वागणूक दिली जात नाही म्हणत ‘या’ ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा
- यांच्या वकिलांचा चौकशी आयोगासमोर मोठा खुलासा; म्हणाले…
- आम्ही शेवटपर्यंत एसटी कामगारांसोबत-सदाभाऊ खोत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
