नागपूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचं मिशन विदर्भ सुरू होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपुरात १४४ कलम लागू आहे मात्र तरीही त्यांच्या दौऱ्याला परवानगी देण्यात आली असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोठ्या नेत्यांच्या सभेला परवानगी मिळते, आणि आम्हाला नाही. अमरावती कारण असो किंवा कोविड – ते काय कोविड न होणारे जॅकेट घालून येतात का, असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केलाय.
नागपुरात १४४ धारा लागू असल्यामुळे तुपकर यांच्या सभेला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही तुपकर यांनी आंदोलन पुकारलं आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी तुपकर यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुकारलं आहे. नागपुरातील संविधान चौकात तुपकर यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलेली असताना शरद पवारांच्या दौऱ्यावर काहीच आक्षेप घेण्यात आला नाही म्हणून तुपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरमधून पवारांच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात होत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची सध्या मोर्चे बांधणी सुरू आहे. राष्ट्रवादी पक्ष देखील याच साठी मिशन विदर्भा करत आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भात शरद पवारांचा दौरा हा राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा’
- सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या वागणुकीवर वॉर्नरची पहिली प्रतिक्रिया
- ‘राक्षसी वृत्तीची बाई’; कंगनाच्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया
- पाकिस्तानला आणखी एक धक्का; वेगवान गोलंदाजाचा कसोटी क्रिकेटला निरोप
- उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यावर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
