🕒 1 min read
मुंबई : तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला आणि अमेझॉनवर प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. एका विशिष्ट आदिवासी समुहावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. याशिवाय आयएमडीबीवरही या चित्रपटाला भारतीय श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे. मात्र या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. ‘वेन्नीयार संगम’ संघटनेचे राज्याध्यक्षांनी ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करत चित्रपट निर्मात्यांवर समाजाची बदनामी केल्याचा आरोप केला आहे.
जय भीम चित्रपटात दाखवलेल्या काही दृष्यांमुळे वेन्नीयार समुदायाची बदनामी झाली आहे. प्रतिमाहनन करणारी ही दृष्यं चित्रपटात मुद्दाम टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चित्रपटात दाखवलेला ‘अग्नी कुंदम’ हे प्रतिक वेन्नीयार समुहाची ओळख आहे. तसेच वेन्नीयार समुदायाविषयीचे दृष्य चित्रपटातून काढून टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अब्रुनुकसानीसाठी नोटीस मिळाल्यानंतर ७ दिवसात ५ कोटी रुपये द्यावेत असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
नोटीसमध्ये देण्यात आले आहे की, “चित्रपटात कोठडीत निर्दोष व्यक्तीचा छळ करून त्याची हत्या करणाऱ्या आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव ‘गुरुमुर्ती’ असं ठेवण्यात आले आहे. तसेच त्याचा उल्लेख गुरू असा करण्यात आलाय. गुरू हे वेन्नीयार समुदायातील एका मोठ्या नेत्याचं नाव आहे. याशिवाय पीडिताच्या मृत्यूची तारीख सिद्ध करताना या आरोपी पोलीस अधिकाऱ्याच्या घरात दाखवलेल्या कॅलेंडरवर वेन्नीयार समुदायाचं प्रतिक दाखवण्यात आल आहे,” या बदनामीसाठी निर्मात्यांनी जाहीर माफी मागावी असे देखील सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काही राजकीय पक्षांचे घटक त्यांच्यातील नैराश्य…- शरद पवार
- नवाब मलिक यांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांवर आशिष शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- भाजप नेत्यांचं दंगे घडवण्याचं षडयंत्र, पैसेही वाटले; मलिकांचा खळबळजनक आरोप
- ‘महात्मा ज्योतीराव फुले’ योजनेचा वैजापूरातील ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ
- आता राष्ट्रवादीही मनपा निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी

