🕒 1 min read
मुंबई : आर्यन खान प्रकरणाचा तपास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेत यासाठी दिल्ली मुख्यालयातील अधिकाऱ्यांचे विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे एसआयटीचे पथक आता मुंबईत दाखल झाले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांनी टीका केली असून त्यांना भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
याबाबत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत नवाब मलिकांवर निशाना साधला आहे, भातखळकर म्हणाले, एनसीबी एसआयटीने तीन प्रकरणांचा तपास सोडला असून आर्यनसह तीनच प्रकरणांचा एसआयटी तपास करणार आहे. मंत्री नवाब मलिक यांनी एसआयटीच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे म्हणे. आक्षेप घ्यायला नवाब मलिक कोण लागून गेले आहेत? त्यांनी आपला वकूब ओळखून वक्तव्ये करावीत. असे भातखळकर म्हणाले.
एनसीबी एसआयटीने तीन प्रकरणांचा तपास सोडला असून
आर्यनसह तीनच प्रकरणांचा एसआयटी तपास करणार आहे.
मंत्री नवाब मलिक यांनी एसआयटीच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे म्हणे.
आक्षेप घ्यायला नवाब मलिक कोण लागून गेले आहेत? त्यांनी आपला वकूब ओळखून वक्तव्ये करावीत. pic.twitter.com/8j468sME3d— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 16, 2021
मुंबईतील क्रूझ ट्रग्ज प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक यांच्यावर आरोपांचे सत्रच सुरु केले आहे. याबाबत मलिकांनी ट्विटरवर के.पी. गोसावी आणि काशिफ खान यांच्यातील संभाषणाचं व्हॉट्सअप चॅट शेअर करत आरोप करत काशिफ खानला प्रश्न का विचेरले जात नाहीत. काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यातील संबध काय? असा प्रश्नही मलिकांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK सामन्यापूर्वी चाहत्यांनी केले हवन, टीम इंडियाच्या विजयासाठी केली प्रार्थना!
- ‘जीआरमध्ये ‘संभाजीनगर’ नाव आलंय, लवकरच घोषणाही होईल’, संजय राऊतांचा दावा
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
