Share

आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ?; अटके पासून अंतरिम दिलासा नाही

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सोमवारी(१५ नोव्हें.)सिटी सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे अडसूळांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ईडीने घरावर छापे टाकल्यानंतर तसेच चौकशीसाठी बोलावल्यानंतर अटकेच्या भीतीने अडसूळ यांनी आधी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी ‘ईडी’चे समन्स रद्द करण्याची मागणीही केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. तसेच अटक टाळायची असल्यास कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची मुभा त्यांना दिली होती. त्यानुसार अडसूळ यांनी विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने सोमवारी त्यांच्या अर्जावर निर्णय देताना अडसूळ यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. अडसूळ हे बँकेचे माजी अध्यक्ष असून त्यांनी बँकेत ९८० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्य़ाच्या आधारे ‘ईडी’कडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

दरम्यान, अडसूळांवर सिटी सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात कारवाई करण्यात येत आहे. मुंबईत २७ शाखा असलेल्या सिटी सहकारी बँकेवर घोटाळ्यामुळे सन २०१८ पासून रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आहेत. आनंद अडसूळ हे या बँकेचे अध्यक्ष असून, अभिजित अडसूळ हे संचालक आहेत. नियमबाह्य कर्ज दिल्यानेच ही बँक घोटाळ्यात अडकली व त्यात आर्थिक गैरव्यवहार झाला, असा ईडीचा संशय आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने तपास सुरू केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!