🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील वाद मिटण्याचं काही नावं घेत नाही. त्रिपुरा राज्यात झालेल्या अत्याचाराविरोधात 12 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 ते 20 हजार जणांनी निषेध मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात दुकानांची तोडफोड, काहींना मारहाण झाल्याने शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. यानंतर 13 नोव्हेंबरला भाजपने अमरावती बंदची हाक दिली. या बंदलाही हिंसक वळण लागलं.
राज्यातील बंदच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केलं असून त्यांनी भाजपवर काही गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मलिकांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
भाजपने बंदच्या आडून सुनियोजितपणे दंगली भडकवण्याचं काम केलं. पोलिसांनी हा कट उधळून लावला. राज्यात दंगल घडवण्याचे भाजपचे षडयंत्र होते. राज्यातील जनतेने संयम राखला. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी दंगली भडकल्या नाहीत, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
अमरावती सोडून कुठेच काही घडलं नाही. अमरावतीत कोणत्याही दोन समुदायात दंगल झाली नाही. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी 2 तारखेच्या रात्री दंगलीचं षडयंत्र रचलं. दारु वाटली गेली, पैसे वाटण्यात आले आणि दंगली भडकावल्या गेल्या. अशी माहिती पोलीस चौकशीत मिळाली आहे. सर्व अस्त्र संपल्यानंतर भाजप दंगलीचं राजकारण करत असते. भाजपाचे लोक जाणकार आहेत. त्यामुळे ते काहीही करू शकतात, असंही नवाब मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- आता राष्ट्रवादीही मनपा निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
- ‘साखर सम्राटला बदनामीचा शिक्का लागतो तसा शिक्का शिक्षण सम्राटला लागणं योग्य नाही’
- मोदींच्या विरोधात सक्षम चेहरा नाही असं म्हणता येणार नाही- शरद पवार
- या भेटीच्या निमित्ताने इतिहासाच्या जवळ जाता आलं; केदार शिंदे भावूक
- क्रिप्टोकरन्सीबाबत घेणार मोठा निर्णय; पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
