Share

‘माझ्या सिनेमात हिंदू खलनायक दाखवले गेले तेव्हा…’ रोहित शेट्टीचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ सिनेमा नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल भरपूर चर्चा होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोहित शेट्टीने सिनेमाशी संबधीत अनेक गोष्टींसह सिनेमात हिंदू खलनायक दाखवले गेले याबद्दल चा खुलासा केला आहे.

दरम्यान रोहितने नुकतीच एका मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तर देत असताना रोहितने एका महत्वाच्या मुद्द्यावर त्याचं मत व्यक्त केलंय. सिनेमामध्ये ‘चांगले मुस्लिम आणि वाईट मुस्लिम’ अशा दोन्ही बाजू दाखवल्या गेल्या आहेत. कथेबद्दल विचारल्या गेलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित म्हणाला, “याआधी जेव्हा माझ्या सिनेमात हिंदू खलनायक दाखवले गेले तेव्हा हा प्रश्न का उपस्थित करण्यात आला नाही?” रोहित म्हणाला,”जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की जयकांत शिर्के हिंदू होता आणि मराठी होता. तसचं दुसऱ्या सिनेमातही हिंदू व्हिलन होता. सिम्बामध्येही मराठी म्हणजेच हिंदू व्हिलन होता. या तीनही नकारात्मक भूमिका हिंदू होत्या. मग तेव्हा समस्या का नव्हती कुणाला.?” असं ही म्हणाला.

त्याचप्रमाणे एखाद्या वाईट किंवा चांगल्या व्यक्तीचा त्याच्या जातीशी संबध लावला जाऊ नये असंही तो म्हणाला. थिएटर रिलीजबद्दल बोलताना “ही एक दीर्घ लढाई होती, विशेषत: जेव्हा तुम्हाला ओटीटी कडून चांगल्या ऑफर मिळत असतात. मात्र माझ्यासाठी सूर्यवंशीला थिएटर रिलीजचीच गरज होती.” असं ही व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!