🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक, उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस. वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केवळ राजकीयच नव्हे तर सर्वच क्षेत्रातून त्यांचं अभिष्टचिंतन केलं जात आहे. राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेनेचा बुलंद आवाज, महाविकास आघाडीची धडाडती तोफ खासदार संजय राऊत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तर ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे! हॅपी बर्थडे संजय राऊत जी’ असे ट्विट करत राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनीही राऊत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेनेचा बुलंद आवाज,महविकास आघाडीची धडाडती तोफ, मा.खा. श्री. @rautsanjay61 साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! pic.twitter.com/98L78jQg0P
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 15, 2021
दरम्यान संजय राऊत यांचा आज १५ नोव्हेंबर रोजी वाढदिवस. ते आज वयाची साठी पूर्ण करत आहेत. त्यांनी तीन दशकं सामनाचे कार्यकारी संपादकपद आणि आठरा वर्ष राज्यसभा सदस्य असा पल्लेदार प्रवास केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे- मुख्यमंत्री ठाकरे
- शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे जीवनातली मोठी उपलब्धी- राज्यपाल कोश्यारी
- पुरंदरेंच्या निधनामुळे एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड-एकनाथ खडसे
- पुरंदरेंच्या जाण्यानी मनाला अतिशय वेदना होत आहेत-देवेंद्र फडणवीस
- पुरंदरेंच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली- पंतप्रधान मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
