Share

युती नाहीच निवडणुका स्वबळावरच लढवणार- उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

नाशिक – युतीची शक्ती जरी वेगळी झाली असली तरी कॉंग्रेस -राष्ट्रवादीची ताकद मात्र कधीच मजबूत होणार नाही. राज्यातील जनतेला आघाडी सरकारच्या कामाचा अनुभव वाईट आहे.

स्वबळावर लढण्याचा माझा निर्णय मी जाहिर केलेला आहे. परत-परत निर्णय कसा जाहीर करू असे म्हणत आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूका स्वबळावरच लढणार असल्याचा निर्णयापासून माघार घेणार नसल्याच उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

स्वबळावर निवडणूका लढविण्याचा निर्णय मी जाहीर केल्यावर केवळ सत्तेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होत आहे. पण सत्तेचे त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नसल्याचा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणूका होवू घातल्या आहेत. या निवडणूक कोणत्या पक्षाचे किती मतदार आहेत याची माहिती असते. राज्यात सहापैकी तीन ठिकाणी सेनेचे मतदार अधिक असल्याने आम्ही तेथे आमचे उमेदवार दिले आहेत. तीनही जागा जिंकण्यासाठी आम्ही तेथे कुणाची कशी मदत घ्यायची याची मुभा आम्ही उमेदवार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिली आहे असे स्पष्ट करत विधान परिषद निवडणूकीत युती झाल्याच्या प्रश्नावर उत्तर देण्याचे ठाकरे यांनी टाळले.

सध्या वनगा कुटुंबियांच्या शिवसेना प्रवेशावरून भाजप सेनेमध्ये राजकारण रंगत आहे. याबदल विचारल असता, माजी खासदार चिंतामणराव वनगा यांनी पालघर सारख्या भागात संपूर्ण आयुष्यभर हिंदूत्व, संघ आणि भाजपासाठी वेचल आहे. वनगा यांचे कुटुंबीय मातोश्रीवर आल्यावर आपण त्यांना पुन्हा एकदा विचार करण्यासाठी विचारले, पण त्यांनी आम्हाला याचा पुन्हा अनुभव घ्यायचा नाही, आम्हाला शिवसेनेत यायचं आहे म्हणल्यावरच आम्ही त्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याच उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

भुजबळ आणि खडसेंसोबत जे झाल ते सर्वांनी बघितल असल्याच म्हणत दोन्ही नेत्यांबदल बोलण्याच त्यांनी टाळल आहे. नाणार प्रकल्प विदर्भात जाणार असले तर काही हरकत नाही, विदर्भाच्या विकासाच्या गप्पा न मारता खरा विकास करणे गरजेच असल्याच मत उद्धव ठाकरे यांनी मांडले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!