Share

पडळकर आणि सदाभाऊ कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का?-अनिल परब

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज संपाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. यानंतरही राज्यभरात कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा कामगारांना आवाहन केलं आहे.

अनिल परब यांनी म्हटलं की, हायकोर्टाने दिलेले आदेश कर्मचाऱ्यांचे हित बघून दिलेत. त्यांची विलिनीकरणाची मागणी मोठी आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. हा आदेश जसा आम्हाला लागू, तसा त्यांनाही लागू होतोय.. यात भडकवणाऱ्या नेत्याचे नुकसान होत नाही, कामगारांचे होत आहे, असं परब म्हणाले.

विलिनीकरणाची मागणी एक दोन दिवसांत पूर्ण होण्यासारखी नाही. यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिलेत. महामंडळानं एसटी कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. एसटी कामगारांना माझी विनंती आहे की कुणाच्याही भाषणबाजीला बळी पडू नका. नुकसान होऊ देऊ नका, कारण भडकवणारे नेते आपल्याला पगार देणार नाहीत, त्यामुळं कामगारांनी कामावर हजर व्हावं, असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहे का?, असा सवाल अनिल परब यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!