Share

‘पप्पांना मृत्यू आधीच दिसला होता का?’ आर.आर.पाटलांच्या मुलीची भावूक पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

सांगली : राज्याचे माजी गृहमंत्री, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांचे निधन होऊन काही वर्षे लोटली आहेत. फेब्रुवारी २०१५ रोजी आर. आर. पाटील यांचे आजारपणामुळे अकाली निधन झाले होते. परंतू आबांचे पुत्र आणि मुलगी यांना आजही आपल्या वडिलांबद्दलच्या अनेक गोष्टी-किस्से आजही स्मरणात आहेत. तसेच ८ नोव्हेंबर या दिवशीच्या आपल्या वडिलांसोबतच्या आठवणी आज रोहित आणि स्मिता पाटील यांनी शेअर केले आहेत. २०१४च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आर. आर. पाटील यांनी केलेला गावाचा शेवटचा दौरा आणि त्यांच्या अखेरच्या दिवसांबाबत आबांची लेक स्मिता पाटील यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

‘आज ८ नोव्हेंबर. बरोबर ७ वर्ष झाली . माझ्या वडिलाना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन! आजच्या दिवशी २०१४ मध्ये सकाळी ११ वाजता माझ्या वडिलांनी घर सोडले. काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय असं पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते. ३ नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी अत्यंत घणाघाती भाषण केले होते. या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1828042637397239&id=351437568391094

त्यानंतर ६ नोव्हेंबरला पप्पा अंजनीला घरी आले. हेलिकॉप्टरमधून सगळं गाव त्यांनी दोन-दोनदा फिरून पाहिले. घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत. त्याचप्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांकडे पाहून जात असत. पण त्यादिवशी मात्र पप्पा जाताना लोकांमधून वेळ काढून मी आणि माझी बहिण सुप्रिया हिला भेटण्यासाठी आमच्या रूममध्ये आले. पप्पांनी त्यादिवशी वर येऊन आम्हा दोघा बहिणींना घट्ट मिठी मारली. त्याक्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. आम्ही दोघी बहिणीही विचार करू लागलो की, पप्पांना काय वाटले असावे, की पप्पांनी मिठ्ठी मारली आणि पप्पांच्या डोळ्यात का पाणी आले असावे? पण आम्हाला वाटलेही नव्हते की, आज पप्पांनी आम्हाला शेवटचे कुशीत घेतले आहे.

त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारुती-शंकराचेही न चुकता दर्शन घेतले होते. स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की, स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवटचा सत्कार ठरावा! आता आणखी किती सत्कार करणार? कदाचित मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का?’ असा भावूक प्रश्न स्मिता पाटील यांनी उपस्थित करत आठवण जागवली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!