सोलापूर : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना १४ दिवसात एफआरपी रक्कम द्यावी, असा कायदा दहा वर्षापूर्वी कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी केला. आता तेच एकरक्कमी एफआरपी दिल्यास कारखाने बंद होतील म्हणतात. मग हा कायदा करून तुम्ही घोडचूक केली हे मान्य करा. तुम्हाला शेतकऱ्यांची नाही तर कारखानदारांची चिंता आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
गेल्या १३ दिवसांपासून सोलापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली थकीत ऊस बिलासंदर्भात काँग्रेस भवनासमोर आंदोलन सुरू आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांवरही ताशेरे ओढलेत.
ऐन दिवाळीच्या काळात शेतकरी रस्त्यावर उतरून बेवारशासारखं आंदोलन करत आहेत आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात, ही शरमेची बाब आहे. आणि इकडे गुंडांच्या टोळ्यांप्रमाणे एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली जाते. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात राजकीय टोळीयुद्ध सुरू आहे, असा आरोपही राजू शेट्टींनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्य सरकारविरोधात भाजपचं पुण्यात आंदोलन
- ‘टाईम पास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बॉसमध्ये जावं’
- नगर दुर्घटनेप्रकरणी सीएस डॉ. सुनील पोखरणासह सहा जण निलंबित
- ‘ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास या…’, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
- मानहानीच्या याचिकेनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांची अजून एक तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

