Share

‘…आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत’, धनंजय मुंडेवर फडणवीसांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

परळी : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी यांनी भाजपवर टीका करत आमचे जे शक्तीपीठ आहे त्यावर टीका केली की यश मिळते असं भाजपाला वाटत असेल. पण असे प्रयत्न केले तरी भाजपाला मातीत गाडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही असे वक्तव्य केले होते. दरम्यान दिवाळीत धनंजय मुंडेंकडून स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीने ठुमके लावले होते. त्यानंतर सामाजिक मंत्र्याचे भान हरवले आहे, अशी टीका धनंजय मुंडेंवर करण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली असून ते म्हणाले की,’अरे वेड्या, भारतीय जनता पार्टी मुंबईच्या मातीतून उभी राहीली आहे. २ वरुन ३०२ वर गेलेली हा पार्टी आहे. चार-सहा खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगण्याचं कारण नाहीये. आम्हाला मातीत गाड़णारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, एसटी संप सुरू आहे आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत, हे आम्हाला सांगताय मातीत गाडून टाकू, भाजपचा कार्यकर्ता हा देखील तुम्हाला पुरेसा आहे, अशा वल्गना करू नका, सामान्य माणसाच्या हिताचे काय काम आपण करू शकतं हा प्रयत्न तुम्ही करा’, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!