🕒 1 min read
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील सरकार उखडून फेका असे अवाहन केले केले होते. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपाला प्रतिउत्तर दिले आहे. उखडायचंच असेल तर अरुणाचलमधून चीन आणि काश्मीरमधून अतिरेक्यांना उखडून फेका, असा घणाघात संजय राऊतांनी भाजपावर केला आहे.
संजय राऊत म्हणाले, जेपी नड्डा सदगृहस्थ आहेत. चांगले नेते आहेत. नड्डा यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचं सरकार उखडून फेका. पण महाराष्ट्रातील सरकार उखडण्याची भाषा करण्याआधी त्यांनी अरुणाचल प्रदेशात चीनने घुसखोरी करून गावंच्या गावं वसली आहेत. ती आधी उखडून फेकावीत. जम्मू -काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. दहशत निर्माण झाली आहे. अतिरेक्यांचे अड्डे निर्माण झाले आहेत. हे अड्डे आधी उखडून फेका, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
जेपी नड्डा यांचं विधान म्हणजे भाजपचं वैफल्य असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला. महाराष्ट्रात प्रयत्न करूनही भाजपला आघाडीचा बालही बाका करता आला नाही. इतकं मोठं राज्य, केंद्रीय सत्ता, संपूर्ण केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून दहशत, दबाव आणि पैसा याचा वापर करूनही सरकार पडत नसेल तर वैफल्य येणं हे स्वाभाविक आहे, असा खोचक चिमटाही राऊतांनी काढला.
अरुणाचलमधून चीनला आणि काश्मीरमधून अतिरेक्यांना उखडून झालं की मग भाजपने पूर्णपणे महाराष्ट्राकडे वळावं आणि राजकीय उखडबाजी जी काही आहे जरूर करावी, असा घणाघात राऊतांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे येत्या काळात स्पष्ट होणार- नाना पटोले
- ‘परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं’, नाना पटोलेंचा हल्लाबोल
- आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटींची गरज- राजेश टोपे
- …या संशोधनातून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप भडकू नयेत- संजय राऊत
- ‘…त्यासाठीच एकांतवासात जातोय’, अमोल कोल्हेंच्या पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
