भाजपचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडा हिसामध्ये एका धर्मशाळेच्या उद्घाटनासाठी दाखल झाले होते. याची खबर शेतकरी आंदोलकांना लागताच ते इथं उपस्थित झाले आणि त्यांनी खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एकीकडे भाजप कार्यकर्ते खासदार जांगडा यांच्यासाठी ‘जिंदाबाद’च्या घोषणा देत होते. तर दुसरीकडे शेतकरी ‘मुर्दाबाद’च्या घोषणा देऊन त्यांचा विरोध करत होते.
रामचंद्र जांगडा यांना आज आंदोलक शेतकऱ्यांचा रोषाला सामोरं जावं लागलं. शेतकऱ्यांच्या एक गटाने हरियाणामधील हिस्सार जिल्ह्यात खासदार जांगडा हे एका धर्मशाळेच्या उद्घाटनासाठी आले असात त्यांना काळे झेंडे दाखवले गेले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी, पोलीस व आंदोलकांधमध्ये झडप झाली, शिवाय खासदार जांगडा यांच्या कारची काचही देखील फोडली.
या दरम्यान मोठ्या संख्येत पोलीस दलही तैनात करण्यात आलं होतं. पोलिसांनी चारही बाजुंनी बॅरिकेडस् उभारून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्नही केला. परंतु, घटनास्थळी शेतकरी आंदोलक मोठ्या संख्येनं उपस्थित असल्यानं पोलीस दलही त्यांच्यासमोर कमी पडल्याचं दिसून आलं. या घटनेसाठी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं.
महत्वाच्या बातम्या
- किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ
- ‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’
- आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण
- एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची हौस आली नाही; चंद्रकांत पाटलांचा टोला
- ‘ज्यांना काही समजतच नाही अशी मंडळी…’, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
