🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकरी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरुन सध्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना वारंवार समीर वानखेडे यांच्यावर टीका करत रोज नवनविन खुलासे करत आहे. या सर्व प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिकांंसारखी लोक मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं होत. यावर आता नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो. त्यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नाही. मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकत आहेत. मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे त्यासाठी चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका, अशा शब्दात मलिकांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिले आहे. त्यावरुन चंद्रकांत पाटलांनी मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
कुणाच्या तरी खिशात राहण्याची, कुणाच्या तरी इशाऱ्यावरून बोलण्याची नवाब मलिकसाहेबांना सवयच असावी. तुमचं खिशात ठेवून दाखवाच हे आव्हान स्वीकारलं. माझ्या खिशात दिसेल संघाची शिस्त, शुचिता, आदरभावना आणि योग्य मूल्यांसह योग्य व्यक्तींप्रती निष्ठा. मलिकसाहेब, हे सगळं झेपेल तुम्हाला?, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
कुणाच्या तरी खिशात राहण्याची, कुणाच्या तरी इशाऱ्यावरून बोलण्याची श्री. नवाब मलिकसाहेबांना सवयच असावी. तुमचं खिशात ठेवून दाखवाच हे आव्हान स्वीकारलं. माझ्या खिशात दिसेल संघाची शिस्त, शुचिता, आदरभावना आणि योग्य मूल्यांसह योग्य व्यक्तींप्रती निष्ठा. मलिकसाहेब, हे सगळं झेपेल तुम्हाला? https://t.co/YwPEUioIE9
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 31, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- फरार परमबीर सिंह बेल्जियममध्ये आहेत; संजय निरुपम यांचा दावा
- पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच; निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सुप्रिया सुळेंचे आदेश
- पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात विनायक मेटेंची एन्ट्री; स्वबळावर की भाजपसोबत?
- त्या मुलाकडे काहीच सापडलं नाही मग त्याला एवढे दिवस अटक का?; आर्यन खान प्रकरणी सप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- कोर्टात जा, पण बदनामी करू नका; ज्ञानदेव वानखेडेंचा नवाब मलिकांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

