🕒 1 min read
मुंबई: अमरावती जिल्ह्यातील १७ वर्षीय शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नकसान झाले आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती प्रचंड हालाकीची असल्याने आणि गेल्या तीन वर्षांपासून हातात पिकच येत नसल्याने निराश झालेल्या 17 वर्षीय सेजलने आत्महत्या केली आहे. आता यावरूनच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.
शेतकरी लखीमपुरचा असेल तरच लक्ष देणार का महाराष्ट्रातील संवेदना शुन्य सरकार. महाराष्ट्रामध्ये १७ वर्षीय शेतकऱ्यांच्या मुलीने आई वडीलांना भार होत आहे म्हणून आत्महत्या केली आहे. आपण राज्यात कधी लक्ष देणार आहात? असा संतप्त सवाल सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करत केला आहे.
शेतकरी लखिंमपुरचा असेल तरच लक्ष देणार का महाराष्ट्रातील संवेदना शुन्य सरकार.
महाराष्ट्रामध्ये १७ वर्षीय शेतकऱ्यांच्या मुलीने आई वडीलांना भार होत आहे म्हणून आत्महत्या करत आहे.
आपण महाराष्ट्रामध्ये कधी लक्ष देणार आहे ?
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) October 24, 2021
दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील छिंदवाडीत राहणारी 17 वर्षीय सेजल जाघव या तरुणीने आत्महत्या केली आहे. शेतात काहीही पिकत नाही. घर चालवण्यासाठी, शिक्षणासाठी कर्ज काढले आहे. शाळेत जाण्यासाठी कपडेही नाहीत. या सर्व परिस्थितीमुळे तिने ही टोकाची भूमिका घेतली. दरम्यान मृत्यूपूर्वी तिने लिहिलेली सुसाईड नोट समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बिहारींना पोटासाठीच नव्हे शिक्षण आणि हनिमूनसाठीही इतर राज्यांमध्ये का जावं लागतं?, कन्हैय्या कुमारचा सवाल
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘कमी प्रमाणात ड्रग्ज सापडल्यास…’, सामाजिक न्याय मंत्रालयाची महत्त्वाची मागणी
- कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबतच्या नात्यासंदर्भात अरूसा आलम यांचे स्पष्टीकरण; म्हणाल्या…
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

