🕒 1 min read
पटणा: काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका करत संतप्त सवाल केला आहे. बिहारची अवस्था अत्यंत वाईट आहे. बिहारींना पोटासाठीच नव्हे तर शिक्षण आणि हनिमूनसाठीही इतर राज्यांमध्ये का जावं लागतं? असा संतप्त सवाल कन्हैय्या कुमार यांनी केला आहे.
बिहारच्या कुशेश्वरस्थान आणि तारापूरमध्ये विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर कन्हैय्या कुमार याठिकाणी प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. विस्थापित होणं हा एक मोठा सवाल आता बनून गेला आहे. बिहारमध्ये विकास अडकला असल्याचे कन्हैय्या कुमार यांनी म्हटले आहे.
दरम्यान कन्हैया कुमार यांनी कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK सामन्यापूर्वी चाहत्यांनी केले हवन, टीम इंडियाच्या विजयासाठी केली प्रार्थना!
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’

