Share

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबतच्या नात्यासंदर्भात अरूसा आलम यांचे स्पष्टीकरण; म्हणाल्या…

Published On: 

🕒 1 min read

पंजाब : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अमरिंदर यांच्या पाकिस्तानी पत्रकार मैत्रिणीचे पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’शी संबंध असल्याचा दावा करत पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर रंधावा यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या आरोपांनंतर अमरिंदर सिंग यांच्याकडूनही त्वरित प्रत्युत्तर आले होते. याच पार्श्वभूमीवर अरूसा आलम यांनीही आता मौन सोडले असून त्यांनी त्यांच्या आणि अमरिंदर सिंग यांच्या नात्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

फ्री प्रेस जर्नलशी संवाद साधतांना अरूसा आलम म्हणाल्या की,’माझे कॅप्टन साहेबांशी अतिशय माणुसकीचे नाते आहे. मी त्यांची खूप चांगली मैत्रीण आहे, याचा मला खूप अभिमान आहे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. आमच्या नात्यावर टीका करणारे आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे लोक नैतिकतेच्या बाबतीत सिंग यांच्या जवळही जाऊ शकत नाही.’ तसेच मी आणि पाकिस्तानमधील माझ्या कामांची RAW ने परस्पर गुप्तचर संस्थांमार्फत कसून तपासणी केली आहे. सर्व तपासणीनंतर मला रॉ आणि इतर आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांनी सर्व आरोपातून मुक्त केले आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’अमरिंदर यांना त्यांच्याच सहकाऱ्यांनी ज्या प्रकारे त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले. त्यामुळे सिंग दुखावले गेले होते. ज्या लोकांनी त्यांना पदावरून हटवलं, ती लोकं सिंग यांच्यामुळेच राजकारणात मोठी झाली, त्यामुळे काँग्रेसने माकडाच्या हातात वस्तरा दिला आहे,’ असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल न्याय मिळवण्यासाठी त्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ शकते. तसेच ज्यांनी माझे फोटो आणि माहिती प्रसिद्ध केली अशा सर्व राजकारणी आणि मीडिया हाऊसच्या विरोधात मानहानीच्या याचिका दाखल करण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि मानवाधिकार आयोगामार्फत मी त्यांच्यावर बंदी घालणार, असेही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!