🕒 1 min read
मुंबई : मीरा भोईंदर मध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने भाजपा नेत्यांनी गुरुवारी सिल्हर पार्क या ठीकाणी आंदोलन केले होते. या आंदोलनात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न केलेल्या कार्यकर्त्यांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह एकूण १०५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या कार्यकर्त्यांनी आंदोलनात मास्क लावला नव्हता, तसेच सोशल डिस्टन्सिगचे पालन केले नव्हते. त्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका असून गर्दी जमवल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यंदा भरपूर पाऊस होऊनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मीरा-भाईंदरमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. याकडे यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य अभियंता सुधाकर वाघ यांनी, जास्त पाणी सोडल्यास पाइपलाइन फुटण्याचा धोका असल्याने आम्ही ११० एमएलडीपेक्षा जास्त देऊ शकत नाहीत, असे स्पष्ट केले. शहराला एका महिन्यात एमआयडीसीला ४००० एमएलडी पाण्याऐवजी केवळ २३०० ते २७०० एमएलडी पाणी मिळत असल्याचा दावा नरेंद्र मेहता यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशातील शिक्षण प्रगत झाल्याशिवाय उद्योगविश्व किंवा जगाचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही – सामंत
- मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही खरी बातमी असावी; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन भातखळांची टीका
- आरएसएस विरोधात वक्तव्य केल्याने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल
- अखिलेश यादव आणि प्रियंका गांधींची विमानामध्ये भेट; नेमके काय झाली चर्चा?
- नाशिकमध्ये यंदा शिवसेनाच सत्तास्थानी असणार; संजय राऊतांचा विश्वास

