नागपूर : कोणतीही निवडणूक जवळ येते तेव्हा भाजपकडून अशा प्रकारच्या घटना घडवल्या जातात. जसे की आता आर्यन खान प्रकरण घडले. याद्वारे भाजपकडून हिंदू आणि मुस्लिमांचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत तीनदा त्याचा जामीनही नाकारण्यात आला आहे. गुरुवारीच अभिनेता शाहरुख खान याने आर्यन खानची आर्थर रोड या ठिकाणी जाऊन भेट घेतली.
आता याप्रकरणी पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहेत. गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर २१ हजार कोटींचे ड्रग्ज मिळाले आहे. त्याबद्दल भाजप नेते काहीच कसे बोलत नाहीत? हे पोर्ट कुणाच्या मालकीचे आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज भारतात का आणण्यात आले? याची चौकशी केली का जात नाही? , असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय. यापूर्वी असं कधीही घडलं नव्हतं. नवाब मलिक आणि आर्यन खान हे दोन विषय वेगळे आहेत. नवाब मलिक यांचे एनसीबी आणि त्याच्या अधिकाऱ्यांवर काही आक्षेप आहेत. त्यामुळे ते वारंवार बोलत असतात, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. नवाब मलिक यांची एनसीबी विभागा संदर्भात तक्रार आहे असे दिसते. त्यामुळे एनसीबीविरोधात ते सातत्याने आवाज उठवत आहेत, त्याबद्दल बोलत आहेत असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- देशातील शिक्षण प्रगत झाल्याशिवाय उद्योगविश्व किंवा जगाचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही – सामंत
- मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही खरी बातमी असावी; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन भातखळांची टीका
- आरएसएस विरोधात वक्तव्य केल्याने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल
- मुख्यमंत्री ठाकरे औरंगाबादेत दाखल, उच्च न्यायालय खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे करणार उद्घाटन
- धुळ्यात बॅनरवरील फोटोचा वाद; रोहित पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात झटपट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

