Share

‘राजकिशोर मोदी यांच्या प्रवेशाने बीड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होणार’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून अंबाजोगाई नगर पालिकेसह केज विधानसभेतही पक्ष एकहाती विजय मिळवेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकिशोर मोदी यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना काल व्यक्त केला.

राजकिशोर मोदी यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी व पदाधिकारी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. आज नव्याने पक्षप्रवेश झालेले पापा मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांची विचारसरणी देखील समान आहे. त्यामुळे पक्षाच्या वाईट काळात सोबत राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होऊ न देता, जुने व नवे अशा सर्वांनाच सोबत घेऊन जिल्ह्यात एकजुटीने पक्षावाढीसाठी काम करू असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

यावेळी कार्यक्रमाला पक्षाचे आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय दौंड, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार राजेंद्र जगताप, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी आमदार अमरसिंह पंडित, बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राजेसाहेब चव्हाण, शिवाजी सिरसाट, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, भाऊसाहेब तरमळे तसेच राजकिशोर मोदी व विजय चव्हाण यांच्यासमवेत प्रवेश केलेले सर्व सहकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!