🕒 1 min read
मुंबई : महाआघाडीच्या सर्व मंत्र्यानी आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे. कारण केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी लागल्या आहेत. तसेच, यामध्ये केवळ मराठी अधिकाऱ्यांना सातत्याने टार्गेट केले जात आहे. धक्कादायक म्हणजे होऊ घातलेल्या धाडी आणि त्यांच्या तारखा भाजप नेते आधी सांगतात आणि त्यानंतर कारवाई होते. त्यामुळे याचा अर्थ असा की यंत्रणा भाजपसाठी काम करत आहेत? असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर केला आहे.
राज्यात कुठलीही घटना घडली तरी, प्रविण दरेकर स्टुडिओमध्ये बसलेले दिसतात. याचा अर्थ असा होतो की, एकतर ते स्टुडिओमध्ये जाऊन बसलेले असतात किंवा मीडियाचे लोक त्यांच्या घरी जाऊन बसलेले असतात. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी प्रतिक्रिया देण्यासाठी प्रविण दरेकर उपलब्ध होतात, असा खोचक टोला यावेळी भास्कर जाधवांनी दरेकरांना लगावला आहे.
आता नांदेडला पोटनिवडणूक लागली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी ते काहीही करू शकतात. 2014 पूर्वीची भाजपची आंदोलनं पाहिली तर लक्षात येईल की भाजप नेते डोक्यावर सिलेंडर घेऊन जायचे. त्यावेळी प्रत्येक वेळी म्हणायचे कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा. आता म्हणायची वेळ आली आहे की, ‘कुठे नेवून ठेवला भारत माझा’ असा वाढत्या महागाईवरून भाजपला त्यांनी टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिका-यांना जबाबदा-यांचे वाटप; अतुल लोंढे यांच्याकडे महत्वाची जबाबदारी
- …म्हणून ही जागा ठेवणं योग्य नाही; बाबुल सुप्रियोंचा खासदारकीचा राजीनामा
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
