Share

दिलासादायक! मुंबईमध्ये दुकान आणि हॉटेल आता १२ पर्यंत खुली राहणार: आरोग्यमंत्री

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेऊन विविध मुद्यावर चर्चा केली. त्यानंतर आता मुंबईमध्ये दुकान आणि हॉटेल रात्री १२ पर्यंत सुरु राहणार आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच राज्यातील इतर शहरात स्थानिक प्रशासन योग्य तो निर्णय घेईल असेही टोपे यांनी सांगितले.

कोरोना रुग्णाची संख्या हळू-हळू कमी होत असल्याने नियमांची शिथिलता राज्य सरकार कडून देण्यात येत आहे असे समजते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे हेही सुरू करीत आहोत. तसेच अम्युझमेंट पार्क देखील त्याच दिवशी सुरु होतील. कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, राज्यात दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूणे हि काळजी प्रत्येक नागरिकने घेणे  गरजेचे आहे. लोकांनी बेसावध राहू नये म्ह्णून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी, असे वेळीवेळी राज्य सरकारकडून सांगण्यात येते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!