🕒 1 min read
मुंबई : २०१९ची महाराष्ट्रातील निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. मात्र या ऐतिहासिक घडामोडीची खरी सुरवात झाली होती ती १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यामधून. राष्ट्रवादीला एकामागून एक नेते रामराम ठोकत होते. भाजपने तर समोर लढायला ‘पैलवान’ नाहीच अशा अविर्भावात लढायला सुरवात केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी शरद पवारांची ती भर पावसातील ऐतिहासिक सभा साताऱ्यात झाली. या सभेने फक्त साताऱ्याचेच तर राज्याचे राजकारण बदलले होते. 80 वर्षांचे शरद पवार भर पावसात भाजपवर तुटून पडले होते. आणि राज्यातील युवा पिढी त्यांना भरघोस पाठिंबा देत होती. जसा पाऊस बरसत होता तसेच पवारही भाजपवर बरसत होते. शरद पवार यांच्या सभेला दोन वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त सुप्रिया सुळे यांनी पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
https://www.facebook.com/supriyasule/posts/4707429022622391
१८ ऑक्टोबर 2019 रोजी साताऱ्यात शरद पवारांनी जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभा आयोजित केली होती. याबाबत फेसबुक पोस्त करत सुप्रिया सुळे यांनी लिहिले की, हाच तो क्षण, हिच ती वेळ…आज बरोबर दोन वर्षे झाली,जेंव्हा पुन्हा एकदा सिद्ध झाले की, ‘महाराष्ट्राचा स्वाभिमानी यशवंत विचार कधीही दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही आणि यापुढेही झुकणार नाही.’ या सभेदरम्यान मुसळधार पावसात शरद पवारांनी भाषण थांबवले नाही. पावसात भिजत पवारांनी भाषण करत विरोधकांनावर जोरदार टीका केली होती.
दरम्यान, या सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सभेबद्दल उत्सुकता होती. पाटणमधील सभा उरकून पवारांनी साताऱ्यातील सभेच्या मैदानावर पाऊल ठेवताच पाऊस सुरू झाला; पण लोक जागचे हलले नाहीत. पवार बोलायला उभे राहिले आणि पावसाचा जोर वाढला. लोक समोर भिजत असल्याने पवारांनी डोक्यावरची छत्री बाजूला केली आणि धो-धो पावसाबरोबरच धीरगंभीर आवाजात शरद पवारही बरसू लागले. ‘गतवेळी माझी चूक झाली, ती दुरुस्त करण्याचे काम सातारकरांनी करावे’, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आणि साताराच नव्हे तर, संपूर्ण राज्याचे राजकारण या सभेने बदलून टाकले. पवारांच्या या सभेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. आजही त्या सभेची चर्चा होत असते.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
