🕒 1 min read
मुंबई : सध्या सत्ताधारी आणि विरोधकांत कलगीतुरा रंगला आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. त्यावर पुण्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांना थेट नवरत्न तेल डोक्याला लावण्यासाठी पाठवले आहे. संदीप काळे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.
बोलताना जरा डोकं शांत ठेवून टीका करत जा, म्हणून हे नवरत्न तेल तुमचं डोकं शांत करण्यासाठी पाठवलं आहे. असा इशाराच जणू या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांना दिला आहे.
यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकनकर यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत पाटील आपलं वय आहे, तेवढी त्यांची कारकीर्द आहे. आपण बोलताना जरा सांभाळून बोलायला हवं. मी तुम्हाला हे परत परत सांगतीये. राजकारणात एकेरी भाषेत बोलू नये, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.
सांगलीत चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण ५४ आमदारांच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळं आयुष्य गेलं, कधी ६० वर तो गेला नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
