🕒 1 min read
उस्मानाबाद : जिल्ह्यात लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला होता. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत संपूर्ण उस्मानाबाद शहरात रॅली काढली.
रॅलीला सुरूवात करण्यापूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मोटासायकल वरती बसून संपूर्ण शहरात साधारण अडीच तास ही रॅली काढून व्यावसायिकांना आणि दुकानदारांना दुकाने बंद करण्याचं आवाहन करण्यात आले.
लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ काढलेल्या या फेरीत उस्मानाबादचे आमदार कैलास घाडगे -पाटील हे देखील सहभागी झाले होते. आमदार पाटिल यांनी उस्मानाबाद शहरात फेरी मारून व्यापाऱ्यांना बंद पाळण्याची विनंती केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्याकडून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘योद्धाचा मुलगा नक्कीच परत लढेल’; राज बब्बरांचे शाहरुखला समर्थन
- ‘येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई सोबत पुण्यात देखील भगवाच फडकेल’
- दुःखद! देवीच्या दर्शनासाठी तीन लहान मुंलींनसह चाललेल्या आईचा दुर्दैवी मृत्यू
- नवरात्रीनिमित्त निवेदितांच्या पारंपरिक साड्यांमधल्या फोटोंनी वेधले लक्ष
- राज्यातील सरकारचे नाव बदलून आता ‘बंद सरकार’ ठेवलं पाहिजे; फडणवीसांची टीका


