परभणी : लखीमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारात महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून रॅली काढण्यात आली. यावेळी आपली लोकशाही कुठे आहे, असा प्रश्न करत खासदार फौजिय्या खान यांनी केंद सरकारवर जोरदार टीका केली.
परभणीत महाविकास आघाडीच्या वतीने रॅली काढत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून लखीमपूर येथील घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या बंदला जिल्ह्यातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
उत्तर प्रदेशातील घटनेने जनरल डायरने केलेल्या जालीयनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून दिली असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला. ही घटना दुर्दैवी असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आंदोलनाला शिवसेना खासदार संजय जाधव, खा. फौजीय्या खान, आ. सुरेश वरपुडकर, आ. राहुल पाटील, तुकाराम रेंगे पाटील, प्रा. किरण सोनटक्के, विशाल कदम, नदीम इनामदार आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘योद्धाचा मुलगा नक्कीच परत लढेल’; राज बब्बरांचे शाहरुखला समर्थन
- ‘येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई सोबत पुण्यात देखील भगवाच फडकेल’
- दुःखद! देवीच्या दर्शनासाठी तीन लहान मुंलींनसह चाललेल्या आईचा दुर्दैवी मृत्यू
- नवरात्रीनिमित्त निवेदितांच्या पारंपरिक साड्यांमधल्या फोटोंनी वेधले लक्ष
- राज्यातील सरकारचे नाव बदलून आता ‘बंद सरकार’ ठेवलं पाहिजे; फडणवीसांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

