Share

‘हे सरकार, शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्याच नावाने आपल्या पोळ्या भाजून घेतंय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. मुंबईत काल मध्यरात्रीपासून 8 बसची तोडफोड झाली आहे. ठाण्यात बस बंद आहेत. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत. महाविकास आघाडीतील नेते हे रस्त्यावर उतरून बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आणि व्यापारी वर्गाला आवाहन करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकार जोरदार टीका केली आहे.

फरार मंत्र्यांचं सरकार, हप्ते वसूली करणारं सरकार, दररोज बलात्काराने स्तब्ध होत आहे. महिलांवर अत्याचार करण्याचं लायसन्स देणारं सरकार कुछ तो शर्म  करो असं म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे.

हे राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करुन दिलासा देण्याऐवजी त्यांचे दुश्मन बनलं आहे. महाविकास आघाडी सरकार प्रत्येक मोर्चांवर अयशस्वी ठरलं आहे. शेतकऱ्यांच्या नावाने आपल्या पोळ्या भाजून घेणारं सरकार, कुछ तो शर्म करो, असंही  चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. सोबतच त्यांनी या बंदला विरोध करत #NoMaharashtraBandh असा हॅशटॅग वापरला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लखीमपूर हिंसाचाराचे देशभर पडसाद उमटले आहेत. शेतकरी वर्गातून या हिंसाचाराचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच आज महाराष्ट्रातील सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!