🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रगच्या प्रकरणात अडकल्याचं दिसत आहे. शनिवारी संध्याकाळी एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला ज्यामध्ये आर्यन खानही सहभागी होता. याप्रकरणी शेखर सुमन, रवीना टंडन, फराह खान, हंसल मेहता, अभिषेक कपूर तसेच अनेक सेलिब्रिटींनी शाहरुखला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांनीही शाहरुख खान आणि आर्यन खानला पाठिंबा दिला आहे.
He came faced & achieved a conquest unparalleled. Hv known @iamsrk for long to know hardships won't deter his soul. As the world teaches his young boy thru wounds, am sure the fighter's son will definitely fight back. Blessings to the young man.
— Raj Babbar (@RajBabbar23) October 10, 2021
राज बब्बर यांनी ट्विट करत लिहिले की, “तो आला लढला आणि त्याने विजय मिळवला. शाहरुखला बऱ्याच काळापासून ओळखत आहे, त्याच्या आत्म्याला या कठीण काळात थोडाही धक्का बसणार नाही. जसे जग त्याच्या लहान मुलाला त्या जखमांद्वारे शिकवते, मला खात्री आहे की योद्धाचा मुलगा नक्कीच परत लढेल. आशीर्वाद,” असे म्हणत राज यांनी शाहरुखला आधार दिला आहे. . यामध्ये शेखर सुमन, रवीना टंडन, फराह खान, हंसल मेहता, अभिषेक कपूर तसेच अनेक सेलिब्रिटींनी शाहरुख आणि गौरीच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या आहेत.
आर्यन गेल्या चार वर्षांपासून ड्रग्जचं सेवन करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. मुंबई ते गोवा या तीन दिवसांच्या क्रूझ सफारीवर श्रीमंत घरची मुले सहभागी असल्याने अमली पदार्थ आणि रेव्ह पार्टीचे आयोजन असल्याचा संशय एनसीबीला आला त्यानंतर सापळा रचून एनसीबीने या क्रूझवर प्रवेश केला. यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांनी अचानक छापे घालत कोकेन, चरस, हशीश, एमडी, एमडीएमए जप्त केले व क्रूझवरील तरुणांना ताब्यात घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही, भाजपच्या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली’
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय
- भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही; खासदार सुप्रिया सुळे यांची घणाघाती टीका
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

