मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेत्री निवेदिता सराफ. त्यांनी गेली बरीच दशके प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांनी मराठी चित्रपट, मराठी मालिकांमध्ये देखील मोलाचे योगदान दिले आहे. नवरात्रीचे औचित्य साधून त्यांनी रंगानुसार परंपरिक साडी परिधान करून फोटो शेअर केले आहेत. तसेच गळयात गोल्डन ज्वेलरी, नाकात नथ, आंबाडा आणि फुलांच्या गजऱ्याने त्यांच्या सौंदर्यात चारचाँद लागले आहेत.
निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. नवरात्रीच्या नऊरंगाच्या साडयांपैकी पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. फोटो शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, ‘पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे तसेच शांततेचे प्रतीक आहे.’कॅप्शन दिसत आहेत. या फोटोत अगदी मराठमोळं रूप सर्वांचे लक्ष वेधत आहे.
दरम्यान त्यांनी पिवळा, हिरवा आणि राखाडी रंगाची साडी परिधान केली असून त्यावरील फोटो ही शेअर केले आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहत्याने या फोटोंवर सौंदर्यवती, अती सुंदर अशा प्रतिक्रिया देत आहेत. निवेदिता सराफ यांनी ‘अशी ही बनवा बनवी’, ‘धूमधडाका’,’थरथराट’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, देऊळ बंद, माझा छकुला आदीं अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांनी छोटया पडद्यावर ‘अगंबाई सूनबाई’ आणि अगंबाई सासूबाई या मालिकेत काम केले असून त्या प्रेक्षकांच्या चाहत्या बनल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही, भाजपच्या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली’
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय
- भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही; खासदार सुप्रिया सुळे यांची घणाघाती टीका
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

