Share

केंद्रीय यंत्रणा फक्त आडनाव खान असल्याने २३ वर्षाच्या मुलाच्या मागे लागली आहे – मेहबूबा मुफ्ती

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र आर्यनला कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळत नसून त्याच्या अडचणीत अधिकच वाढ होत आहे. आज पुन्हा एकदा जामीन अर्ज सादर करण्यात आला मात्र यावर , १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असल्याचा निर्णय देण्यात आला. त्यामुळे पुढील दोन दिवस पुन्हा एकदा आर्यन आणि अरबाज मर्चेंटला ऑर्थर रोड तुरुंगात रहावं लागणार आहे.

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या एनसीबी कोठडीबाबत गुरुवारी सुनावणी झाली होती. मुंबई न्यायालयाने आर्यन खानसह ८ जणांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आर्यन खानच्या अटकेवरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता त्याला धार्मिक रंगही दिला जात आहे. पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी आर्यन खान अटकेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, “चार शेतकऱ्यांच्या हत्येचा आरोपी असलेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर कारवाई करुन उदाहरण देण्याऐवजी केंद्रीय यंत्रणा फक्त आडनाव खान असल्याने २३ वर्षाच्या मुलाच्या मागे लागली आहे. भाजपाच्या मतदारांना खूश करत त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुस्लिमांना टार्गेट केलं जातं ही न्यायाची विटंबना आहे”.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!