Share

भारतात आजसारखे निर्णायक सरकार कधीच नव्हते- पंतप्रधान मोदी

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : सोमवारी(१० ऑक्टो.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन स्पेस असोसिएशनचे व्हर्चुअल पद्धतीने उद्घाटन केले. यावेळी मोदी म्हणाले की,’जिथे गरज नाही तिथे सरकार नियंत्रण संपवणार आहे. तसेच भारतात आजसारखे निर्णायक सरकार कधीच नव्हते. अंतराळ क्षेत्र आणि अंतराळ तंत्रज्ञानासंदर्भात आज भारतात ज्या प्रमुख सुधारणा होत आहेत, त्याचा दुवा आहे. भारतीय स्पेस असोसिएशनच्या स्थापनेसाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.’

यावेळी बोलत असतांना मोदी म्हणाले की,’जेव्हा आपण अंतराळ सुधारणांबद्दल बोलतो तेव्हा आमचा दृष्टिकोन चार खांबांवर आधारित असतो. प्रथम, खाजगी क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण स्वातंत्र्य, दुसरे, सक्षम करणारे म्हणून सरकारची भूमिका, तिसरे, तरुणांना भविष्यासाठी तयार करणे आणि चौथे, अवकाश क्षेत्राला सामान्य माणसाच्या प्रगतीचे साधन म्हणून पाहणे. १३० कोटी देशवासीयांच्या प्रगतीसाठी आपले अंतराळ क्षेत्र हे एक मोठे माध्यम आहे. आपल्यासाठी अंतराळ क्षेत्र म्हणजे, सामान्य माणसासाठी सुधारित मॅपिंग, इमेजिंग आणि कनेक्टिव्हिटी, उद्योजकांसाठी शिपमेंटपासून डिलिव्हरीपर्यंत चांगली गती.’

दरम्यान,  ‘भारताला नवनिर्मितीचे नवीन केंद्र बनवावे लागेल. भारत काही मोजक्या देशांपैकी एक आहे ज्यांच्याकडे एंड टू एंड टेक्नॉलॉजी आहे. आम्ही कार्यक्षमतेला ब्रँडचा अविभाज्य भाग बनवले आहे. मग ती अंतराळ संशोधनाची प्रक्रिया असो किंवा अवकाशाचे तंत्रज्ञान. आपल्याला ते सतत शोधायचे आहे’ असेही यावेळी मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!