Share

‘पोलीसच दुकाने बंद करायला सांगत आहेत, ही कुठली पद्धत?’, मनसेचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीनं शेतकरी विरोधी कायदे व लखीमपूर खेरी इथल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या बंदला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी सहभाग नोंदवला आहे. मात्र, भाजप आणि मनसेने या बंदला तीव्र विरोध केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘लॉकडाऊनमुळं आज लोकांचं कंबरडं मोडलंय. कसेबसे ते सावरू पाहताहेत. सणासुदीत थोडाफार व्यापार होतो, नेमका त्याच वेळी हा सरकारपुरस्कृत बंद केला जातोय. दादरसारख्या भागांत स्वत: पोलीस फिरून दुकानं बंद करताहेत. ही कुठली पद्धत आहे आणि हे कुठलं राज्य आहे,’ असा संतापही देशपांडे यांनी व्यक्त केला.

तसेच संसदेत शेतकरी कायदा बिल पास होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? शिवसेना खासदारांची थोबाडं बंद का होती ? पवारसाहेब संसदेत अनुपस्थित होते, त्याचे कारण काय? असे सवाल संदीप देशपांडे यांनी केले आहेत. ‘शिवसेनेत आता ताकद उरली नाही म्हणून पोलीस वापरावे लागत आहेत. पोलीस दुकाने बंद करीत आहेत. अशी परिस्थिती यापूर्वी महाराष्ट्रात कधी दिसली नव्हती’, असं संदीप देशपांडेंनी सांगितलं.

आज लॉकडाऊनमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. सणासुदीच्या दिवसात थोडा-बहुत व्यापार होतो. अशा दिवसांत तुम्ही बंद करता आहात? हा स्टेट स्पॉन्सर्ड बंद आहे. पोलोस लोकांची दुकाने बंद करीत आहेत. ही कुठली पद्धत? मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पक्ष आणि मायवतींच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये बंद केला का?, असं देशपांडे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!